Dr. Babasaheb Ambedkar Samata Pratishthan

DR. BABASAHEB AMBEDKAR SAMATA PRATISHTHAN

A Company Under Section 8 of Companies Act, 2013 Founded on 11th July, 2017
A Public Sector Undertaking of Department of Social Justice and Special Assistance Gov. of Maharashtra. 
License No. 109557 | CIN: U74999MH2017NPL297149

सामाजिक न्याय दिन

दिनांक: २६ जून २०२६

२६ जून, सामाजिक न्याय दिनानिमित्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान कार्यालय, नागपूर यांच्या वतीने पॉकीट बुक स्वरुपातील संविधान पुस्तिकांचे वाटप.

महाराष्ट्रात २६ जून हा दिवस राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बहुजन समाजाच्या उत्थानासाठी, शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी आणि विषमतेविरुद्ध लढा देणाऱ्या या महान लोककल्याणकारी राजाच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस राज्यभरात अत्यंत उत्साहाने व आदराने पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय भवन, नागपूर येथे आयोजित कार्यक्रम दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन) यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आणि नागरिकांमध्ये, विशेषतः युवा पिढीमध्ये घटनात्मक मूल्यांची जनजागृती करण्यासाठी ५०० संविधान पुस्तिकांचे मोफत वाटप करण्यात आले. समाजातील विविध घटकांतील नागरिक, विद्यार्थी आणि तरुणांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची काही खास क्षणचित्रे (Photos):